शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा आणि पूरग्रस्तांना मदत करा; अन्यथा काळी दिवाळी साजरी करण्याचा मनसेचा इशारा - ETV news
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - उत्तरप्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करणे सर्वस्वी चुकीचे. महविकास आघाडीने अशाप्रकारे बंद करण्यापेक्षा महाराष्टातील शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. कोरोना काळात, तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जे हाल झाले आहे. त्यासाठी त्यांना पीक विमा मिळणे, तसेच त्यांच्या हक्कासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या त्यांच्या पर्याय पोहचवण्यासाठी हे आंदोलन केले गेले. येत्या पंधरा दिवसात जर राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा आणि पुरामुळे त्यांची जी जनावर मेलीत त्यांचा मोबदला दिला नाही तर येती दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला.