भाजप नेते गिरीश महाजन रस्त्यावर साप पकडतात तेव्हा... - Girish Mahajan saves snake life
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12523058-thumbnail-3x2-asdd.jpg)
जळगाव - भाजपचे नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी (मंगळवारी) जामनेर येथे रस्त्यावर साप पकडला. महाजन हे रात्री साडेआठच्या सुमारास जामनेरात आपल्या कारने जात होते. बस स्थानकाजवळ एक भला मोठा साप रस्त्यावरून जात होता. त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी झाली होती. तेव्हा महाजन यांनी आपली कार थांबवून सापाला लीलया पकडले.
स्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या गाडीच्या चाकाखाली येऊन सापाचा मृत्यू होऊ शकतो, किंवा कोणाला तरी साप दंश करू शकतो. म्हणून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाजन यांनी साप पकडला. काही नागरिक सापाला ठार मारणार होते. परंतु, महाजन यांनी वेळीच धाव घेत त्याला जीवदान दिले.
साप पकडल्यानंतर महाजन यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. दरम्यान, गिरीश महाजन हे नेहमी आपल्या बेधडक वागण्यामुळे चर्चेत असतात. काही वर्षांपूर्वी मंत्री असताना त्यांनी बिबट्याला मारण्यासाठी पिस्तुल काढल्याने ते चर्चेत आले होते. आता पुन्हा जळगाववासीयांनी सर्पमित्र गिरीश महाजन अनुभवले.