म्यूकरमायकोसिसबाबत गाफील राहू नये - डॉ. अविनाश भोंडवे - dr avinash bhondve over mucormycosis
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - देशात आणि अनेक राज्यात म्यूकरमायकोसिसच्या रुग्णात वाढ होत आहे. त्यामुळे म्यूकरमायकोसिसचा साथरोग कायद्यात समावेश करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. राज्यात या म्यूकरमायकोसिसचे पाच हजारहून जास्त रुग्ण झाले आहे. त्यावर उपाय करणाऱ्या इंजेक्शनचाही तुटवडा आहे. यामुळे ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा रुग्णांनी गाफील न राहता सतर्क राहायला हवे, असे आयएमचे माजी अध्यक्ष डॉ. भोंडवे यांनी सांगितले. ते 'ईटीव्ही भारत' सोबत बोलत होते.