VIDEO निर्दयीपणाचा कळस: कुत्र्याच्या शेपटाला बांधले फटाके; तरुणाविरोधात गुन्हा दाखल - कोरडी पोलीस स्टेशन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13586052-thumbnail-3x2-asdd.jpg)
नागपूर - मौजेखातर मोकाट कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधण्याचा संतापजनक प्रकार व्हिडिओतून पुढे आला आहे. नागपूरच्या कोरडी पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुढे आली आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जेव्हा श्वानप्रेमी आणि पीपल्स फॉर ॲनिमलच्या सदस्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तरुणा शोध घेतला. त्यांनी तरुणाविरोधात कोराडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी मुक्या प्राण्यांना निर्दयतेने वागणूक अधिनियम कायद्यानुसार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.