VIDEO : नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या कुलाबा शाखेसमोर फटाके फोडले - नारायण राणे अटक बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या कुलाबा शाखेसमोर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी अनेक शिवसैनिक येथे जमले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक, महाड, पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.