येवल्यातील विखरणी सबस्टेशन परिसरात भीषण आग - नाशिक बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13760325-729-13760325-1638100145906.jpg)
येवले ( नाशिक ) - येवला तालुक्यातील विखरणी येथील वीज वितरण कंपनीचे सबस्टेशनच्या आजूबाजूला असलेल्या गवताला आग लागली होती. ही आग वाढत गेल्याने सबस्टेशनच्या आतील बाजूस असलेल्या गवतापर्यंत आगीने शिरकाव केला. त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. ग्रामस्थांनी त्वरित अग्निशामक दलाच्या संपर्क साधला असता तब्बल दोन तासानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.