Union Budget 2022-23 Expectations : खत व औषधाच्या किमती नियंत्रणात आणा, द्राक्ष उत्पादकांच्या अपेक्षा - मोदी सरकार अर्थसंकल्प
🎬 Watch Now: Feature Video
निफाड ( नाशिक ) - केंद्राचे बजेट येत असून या केंद्राच्या अर्थसंकल्पामधून ( Union Budget 2022-23 Expectation ) नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आशा आहेत. विशेष करून खत व औषधाच्या किमती नियंत्रणात आणावे. देशांतर्गत द्राक्ष विक्रीसाठी तसेच निर्यात होणाऱ्या द्राक्षांवर सबसिडी देण्यात यावी. कुठलाही फळ किंवा कुठलाही भाजीपाला आपल्याला जगामध्ये पोहोचवायचा असेल तर चांगले मार्केटिंग करावे लागतात, याची जाहिरात करावी लागते. द्राक्षांपासून आपल्या शरीराला अनेक चांगले विटामिन्स, प्रोटिन्स मिळतात. हे सर्वसामान्य माणसापर्यंत जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यात पोहोचवू शकेल आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात द्राक्षाची जाहिरात करावी लागणार आहे. त्याच्यासाठी विशेष चांगली भरीव आर्थिक तरतूद करणे या बजेटमध्ये करणे अपेक्षित आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण नाशिकच्या द्राक्षांची चव आणि त्याचे वैशिष्ट्य पोहोचू शकलो तर निश्चितपणे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल ( Farmers Expectations From Union Budget ), अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.