अमरावतीत शेतकऱ्याने संत्र्याच्या ५०० झाडांवर चालवला बुलडोझर - शेतकऱ्याने संत्र्याच्या ५०० झाडांवर चालवला बुलडोझर
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळांचे उत्पादन घेतले जाते. परंतु मागील तीन वर्षांपासून संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. संत्रा झाडावर असलेल्या विविध रोगांमुळे संत्रा गळती सुरू झाली आहे. यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्च करून देखील काहीच उत्पादन होत नसल्याने अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील संजय आवारे या शेतकऱ्याने आपल्या चार एकर संत्रा बागेतील 500 हिरव्यागार संत्रा झाडांवर बुलडोजर चालून संत्रा बाग नष्ट करून टाकली आहे. लागवड खर्चही निघत नसल्याने या शेतकऱ्याने आपली हिरवीगार बाग नष्ट केली आहे. लहान मुलांप्रमाणे काळजी घेत लहानाची मोठी केली झाडे संजय आवारे या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी तोडून टाकली आहे. 14 वर्षांपूर्वी संत्राच्या झाडाची त्यांनी लागवड केली होती. चांगले पैसे मिळतील अशी आशा होती. मात्र चार ते पाच वर्षांपासून लावलेला खर्च देखील निघणे कठीण झाले होते. याच चिंतेतून या शेतकऱ्यांनी आपले झाडे बुलडोझर टाकून नष्ट करून टाकले.