Hindustani Bhau : अटकेत असलेल्या 'हिंदुस्थानी भाऊ'च्या नावाने आणखी एक मेसेज व्हायरल, वकील म्हणतात... - हिंदुस्थानी भाऊ अटक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकावून आंदोलन (Students Protest in Dharavi) केल्याप्रकऱणी विकास पाठकला (Vikas Phatak Arrested) अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा एक मेसेज व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये धारावी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. मात्र, कुणीही जमू नये, असे आवाहन हिंदुस्थानी भाऊने (Hindustani Bhau) केले आहे. हिंदुस्थानी भाऊच्या अटकेनंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांसाठी भाऊंना अटक झाली, आता आपण विद्यार्थ्यांनी पुढे येऊन त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. अशा परिस्थितीत आज दुपारी धारावीत विद्यार्थ्यांनी जमा होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, याबाबत पोलिसांनी दक्षता बाळगत दोघांना अटक केली आहे. तर विकास पाठकच्यावतीने त्यांचे वकील अशोक मुळ्ये यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, काही समाजकंटक त्याच्या नावाने हे करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विकास पाठक यांची सुटका होईपर्यंत कोणतेही पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून धारावी पोलीस ठाण्याबाहेर आणि परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.