आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट, 'एमपीएससी'मार्फत परीक्षा घेण्याची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शनिवार (दि.25) आणि रविवार (दि. 26)रोजी होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अचानकर घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या संतापाचे वातावरण आहे. दिवसभर जॉब करून, काहींचे परिक्षा ठिकाण दूर असल्यामुळे दिवसभर प्रवास करून तसेच, वेगवेगळ्या अडचणींचा सामना करून हे विद्यार्थी परिक्षेला निघाले होते. मात्र, प्रशासनाच्या आणि संंबंधित मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे या मुलांवर मानसिक त्रासासह आर्थिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. परिक्षा ही खासगी यंत्रनेकडे सोपवल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. तर, आरोग्य मंत्री याला जबाबबदार असून, त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी सय्यद मोहम्मद सज्जाद यांनी-