व्हिडिओ : पंढरपुरी विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई - solapur district news
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर (सोलापूर) - आगामी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या राऊळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लक्ष विद्युत दिव्यानी मंदिराचा परिसर उजळला आहे. यावर्षी जरी आषाढी एकादशीचा सोहळा दरवर्षीप्रमाणे साजरा होणार नसला, तरिही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दरवर्षीप्रमाणे रोषणाई केली आहे. संत नामदेव महाद्वार, संत तुकाराम भवन, पश्चिम द्वार, मंदिराची शिखरे आकर्षक विद्युत रोषणाईने सुंदर दिसत आहेत. पुण्यातील विठ्ठल भक्त विनोद जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे सेवा म्हणून ही रोषणाई करून दिली आहे.