Makar Sankranti Black Dress : पुण्यात मकर संक्रातीनिमित्त काळ्या रंगाच्या कपड्यांची वाढली मागणी - पुण्यात संक्रातीमुळे काळ्या ड्रेसची ट्रेंड
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - मकर संक्रातीला तिळगुळ जसे विशेष मानले जाते. तसेच संक्रांतीला काळ्या रंगाच्या कपड्यांना विशेष महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कपड्यांच्या बाजारपेठा काळ्या रंगाच्या साड्या आणि ड्रेसने सजल्या आहेत. एक ते दोन महिने आधीच काळ्या रंगाच्या साड्या आणि इतर कपड्यांची जमवाजमव करावी लागते. कोरोना जरी वाढत असला तरीही लोकांचा कल सण साजरा करण्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि मकर संक्रांतीपर्यंत थंडी असते. यामुळे काळे कपडे या दिवशी परिधान केले जातात.