'फेसबुक टू प्रिंट' पर्यंतचा नीलिमा देशपांडे यांचा आगळावेगळा प्रवास
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - जवळपास आपण सर्वजण फेसबुकचा वापर करतोय. या सोशल नेटवर्किंग साईटवरून आपण घरबसल्या लोकांच्या संपर्कात राहू शकतो. आपल्यापैकी बरेचजण नवीन मित्र बनवण्यासाठी फेसबुक वापरतात. बरेच लोक आपल्या प्रत्येक गोष्टी फेसबुकवर पोस्ट करतात आणि त्यावर बरेच लाईक्स आणि कमेंट्सही मिळत असतात. पण, या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त बरेचजण या माध्यमातून आपली मतं व्यक्त करतात, आपले विचार, आपल्या कविता, लेख, चारोळ्या हे सर्व फेसबुकवर पोस्ट करतात. यातून हजारो लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असते. फेसबुकच्या माध्यमातून असे अनेकजण लेखक बनले आणि त्यापैकीच एक आहेत कोल्हापुरातील नीलिमा देशपांडे. त्यांच्या या 'फेसबुक टू प्रिंट' प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बातचीत केली 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...