या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री तर इतर सुपर मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - लॉकडाऊन संदर्भात उडालेल्या गोंधळानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आघाडी सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहे तर अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वतःलाच मुख्यमंत्री समजत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. कुठल्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसीजन घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. तसेच एखाद्या विषयात मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्री बोलतात. मात्र, या सरकारमध्ये एकाच विषयावर पाच मंत्री बोलतात अशी सडकून टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याच्या नादात असा गोंधळ उडतो, असंही ते म्हणाले.