VIDEO : मुख्यमंत्र्यांनी जशास तसे उत्तर दिले, अजित पवारांचा नारायण राणेंना चिमटा - चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रम
🎬 Watch Now: Feature Video
आनंदाच्या क्षणी प्रत्येकांनी मिळूनमिसळून रहायचे असते. मात्र शनिवारी एक नेते उठले त्यांनी जे भाषण केलं.. मग मुख्यमंत्री गप्प बसतात काय. त्यांनी सुद्धा जशास तसे उत्तर दिले. पार बाभळीची उपमा दिली. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चिमटा काढला. चिपी विमानतळ उदघाट्ना दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दरम्यान रंगलेल्या कलगीतुऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर नाव ना घेता टीका केली.
1999 साली चिपी विमानतळाचे भूमिपूजन झाले होते. 25 वर्षानंतर या विमानतळाचे उदघाटन झाले. हे काय एकट्या दुकट्याचे काम आहे का? असा सवाल देखील यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केला. नेहमी विकासावर बोलले पाहिजे. बारामतीमध्ये सुद्धा कोणी पवार साहेबांवर टीका केली तर त्याचे मतदान घटते. आपल्या विरोधात असणारे उमेदवार त्यांच्या सभेत बोलणाऱ्या वक्त्याला सांगायचे पवार साहेबांवर काही बोलू नकोस. बाकी कुणावरही बोला नाहीतर आमची मतं कमी व्हायची, असेही पवार यावेळी म्हणाले.