राज्यात मासळीचा तुटवडा? पालघरच्या सातपाटीतील हंगामी पापलेट उत्पादनात घट
🎬 Watch Now: Feature Video
मासेमारी व पापलेट उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील गत हंगामातील पापलेट उत्पादनामध्ये 190 टन इतकी घट झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात डोलनेट जाळ्याद्वारे काही मच्छीमार, पापलेटच्या लहान पिल्लांची मोठ्या प्रमाणात मासेमारी होत आहे. तसेच मासेमारी बंदी कालावधीची कठोर अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे उत्पादनात घट झाल्याचे सांगितले जात आहे.