पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षांसंदर्भातला निर्णय लवकरच - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड - Varsha Gaikwad on exam
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. सध्या प्रत्येक विभागात कोरोनाचा आढावा घेण्यात येत असून, लवकरच परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना दिली. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावर निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.