अमरावतीच्या अचलपूर शहरात जोरदार; संत्रा फळबागांचे नुकसान - अमरावती न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13384009-1023-13384009-1634529620379.jpg)
अमरावती - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. शनिवारपासून अमरावती जिल्ह्यातही अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना जबर फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातही रविवारी रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील अनेक रस्ते जलमय झाल्याने शहरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचे दिसून आले. नगर पालिकेने नाल्यांची साफसफाई केली नसल्याने रस्त्यांवर पाणी साचले असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे .दरम्यान अचलपूर भागांमध्ये संत्रा पिका फळांचं मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र, संत्रा विकणेच्या वेळेला आलेल्या पावसामुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काढणीला आलेल सोयाबीन पावसामध्ये भिजले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
Last Updated : Oct 18, 2021, 11:15 AM IST