पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी कोविड-19 लसीकरणाचा ड्राय रन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भारतात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यापूर्वी हे लसीकरण कशा पद्धतीने केले जाईल, याची रंगीत तालीम संपूर्ण भारतात शनिवारी केली जात आहे. महाराष्ट्रातही 4 जिल्ह्यांमध्येही ही रंगीत तालीम केली जात आहे. पुणे जिल्ह्यात तीन केंद्रांवर कोविड-19 लसीकरणाचा ड्राय रन घेतला गेला. यामध्ये पुणे जिल्हा रुग्णालय औंध तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, माण आणि जिजामाता रुग्णालय पिंपरी-चिंचवड या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी पंचवीस लाभार्थी बोलवण्यात आले होते. हा ड्राय रन कशा पद्धतीने केला गेला, या संदर्भात औंध जिल्हा रुग्णालयाचे डॉ. बिलोलीकर यांच्याशी बातचीत केली आहे. तसेच, या लसीकरण याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी..