गडचिरोलीत मोदी सरकारविरोधी घोषणाबाजी, राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय - गडचिरोली काँग्रेस आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली : खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झाले. शहरात तब्बल दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोदी सरकार विरोधी निषेधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गडचिरोली तहसिल कार्यालयासमोर संकल्प दिनाच्या कार्यक्रमात मोदी हटावची नारेबाजी करण्यात आली. तर मुख्य गांधी चौकात इंधन दरवाढीविरोधात मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली गेली. देशाला अराजकतेपासून वाचविण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची देशाला गरज असल्याची भावना कार्यकर्ते नेत्यांनी बोलून दाखवली. तहसील कार्यालयासमोर संकल्प दिनाच्या कार्यक्रमात मोदी हटावची नारेबाजी करून मुख्य गांधी चौकात इंधन दरवाढीविरोधात मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, चंदा कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.