विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे भांबावल्यासारखे करत आहेत - नाना पटोले - nana patole comment on devendra fadnavis
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - देशाचे प्रधनमंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री हे भेटले तर चर्चा चालतच असतात. सत्ता गेल्यापासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे भांबावल्यासारखे करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे आले असता केली. पटोले यांनी पोहरादेवी येथे सेवालाल महाराज समाधी, रामाराव महाराज समाधी, जगदंबा मातेचे दर्शन घेतले.