ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है…! नांदेडमध्ये छगन भुजबळांची तोफ धडाडली - देगलूर
🎬 Watch Now: Feature Video
'ये वक्त वक्त की बात हैं, वक्त सबका बदलता हैं, आज तेरा हैं, कल मेरा होगा… अशा शायराणा अंदाजात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देगलूर पोट निवडणुकीत ईडीच्या कारवायांवरूनही भाजपावर हल्लाबोल केला. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही देगलूरमध्ये ठाण मांडून आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही शुक्रवारी देगलूरमध्ये जाऊन काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला.