VIDEO : चंद्रकांत पाटलांना आपल्या संस्कृतीचा विसर; शरद पवारांच्या एकेरी उल्लेखावर रोहित पवारांची प्रतिक्रिया - रोहित पवारांची नांदेडमध्ये पत्रकार परिषद
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठी वा अनुभवी असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एकेरी अथवा आक्षेपार्ह बोलत नसतो. परंतु राज्याच्या राजकारणात चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जो उल्लेख केला, तो चुकीचा आहे. त्यांना त्यांच्या संस्कृतीचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहीत पवार यांनी दिली आहे. ते नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
Last Updated : Oct 19, 2021, 1:02 PM IST