मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारनेच लांबवला - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी सरकार टीका
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मराठा आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारने जितका लांबवता येईल तितका लांबवला आणि केंद्रावर ढकलला, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते विधानभवनाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधत होते. मराठा आरक्षणावरवरुन राज्य सरकार आणि विरोधक असा संघर्ष पुन्हा पेटताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 15 मार्चला होणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. पाहूयात, ते काय म्हणाले?