CCTV VIDEO : कर्तव्य बजावत असताना आरपीएफ अधिकाऱ्याने रेल्वेतून पडत असणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण - आरपीएफ जवानाने महिलेचे वाचवले प्राण
🎬 Watch Now: Feature Video

गोंदिया - आज प्रजासत्ताक दिनी गोंदिया रेल्वे स्टेशनवर (Gondia Railway Station) आरपीएफ अधिकाऱ्याने (RPF Officer) एका महिलेचे प्राण वाचवले (Save Women Life) आहेत. आज सकाळी गोंदिया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफोर्म क्रमांक 3 वर 11. 03 मिनिटांनी गाडी क्रमांक 12410 गोंडवाना एक्सप्रेस आली होती व 11.05 ला सुटली. त्यावेळी एक महिला चालत्या ट्रेनच्या ए2 बोगीत चढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल मागच्या बाजूला गेला व ती महिला चालत्या ट्रेनमधून पडत होती. हे दिसताच त्या ठिकाणी असलेल्या रोशन कुंबरे या आरपीएफ अधिकाऱ्याने त्या महिलेला ट्रेनमध्ये ढकलले. त्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. या घटनेनंतर त्या आरपीएफ जवानाचे कौतूक केले जात आहे.