VIDEO : मध्य रेल्वेवरील केळवलीजवळील पूल गेला वाहून - Kelvali railway station bridge
🎬 Watch Now: Feature Video

रायगड (खालापूर) - मध्य रेल्वेच्या खोपोली व कर्जत या मार्गावरील केळवली रेल्वे स्थानक जवळील पूल पाण्याच्या प्रवाहाबरोबर बुधवारच्या मध्यरात्री वाहून गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण खालापूर तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. मध्य रेल्वेवरील केळवली स्थानका जवळील पूल बुधवारी मध्यरात्री वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. खोपोली ते कर्जत या मार्गावरील रेल्वे सेवा रात्री बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आता खोपोली - कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. पूल दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरु करून रेल्वे सेवा सुरू करा, अशी मागणी नागरिक करत आहेत.