Video : रुग्णालयाच्या आवारात सापडल्या भ्रूणांच्या 11 कवट्या, 55 हाडे - भ्रूणांच्या 11 कवट्या, 55 हाडे सापडली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 13, 2022, 2:05 PM IST

वर्ध्याच्या आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणात धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता ( Illegal Abortion Case Wardha ) आहे. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील महिला डॉक्टर रेखा नीरज कदम यांच्या कदम हॉस्पिटलच्या आवारात भ्रूणांच्या 11 कवट्या आणि 55 हाडांचे अवशेष मिळाले ( Bone Remains Were Found ) आहेत. हाडांचे अवशेष हे एका जुन्या गोबर गॅसच्या खड्ड्यात मिळाल्याची माहिती आर्वी पोलिसांनी ( Arvi Police Station ) दिली. यात हाडांबद्दलची माहिती वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल. पण या हाडांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून बीड जिल्ह्यातील सुदाम मुंडे प्रकरणाच्या ( Sudam Munde Case Beed ) दिशेने वाटचाल तर होत नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.