MLC Election Result 2021 : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी - Defeat of Gopikishan Bajoria
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वसंत खंडेलवाल हे 443 मते घेऊन विजय झाले आहेत. तर, शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे चौथ्यांदा या निवडणुकीत उभे होते. मात्र, ते विजयाचा चौकार मारू शकले नाहीत. जवळपास 109 मतांनी ते या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहे. अंतर्गत गटबाजी आणि महाविकास आघाडीचे मते फुटल्याने भाजपचे उमेदवार हे निवडून आले आहे. तर, वंचितने भाजपला केलेली मदत यामुळेही हा विजय भाजपला खेचता आलेला आहे. दरम्या, 31 मत बाद झाली आहेत. मिळालेली मते-(भाजप - 443), (सेना - 334), (वैध - 777), (बाद - 31) विजयी मतांचा फरक - 109, पक्षीय मतदाराची आकडेवारी (भाजप - 246), (सेना - 124), (काँग्रेस - 191), (राष्ट्रवादी - 91) (इतर - 77), (वंचित - 86) (एमआयएम - 7)