VIDEO : भर पावसात चंद्रकांत पाटलांचे भाषण - चंद्रकांत पाटलांचे भाषण
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाचे नामकरण सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण झाले. फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाला. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झाले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांचे भाषण सुरू असल्याने, त्यांनी मध्येच भाषण न थांबवता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे भरपावसात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या भाषणाची चर्चा रंगली होती.