VIDEO : बनावट लसीकरणाप्रकरणी पोलिसांनी सोसायट्यांवर कारवाई करू नये - भाजपा खासदार - मुंबई बनावट कोरोना लसीकरण
🎬 Watch Now: Feature Video
बनावट लसीकरणाप्रकरणी टोळीला मदत केल्याच्या आरोपाखाली कांदिवली पोलिसांनी रुग्णालयाचा मालक व त्याच्या पत्नीला गुरूवारी (24 जून) अटक केली. या प्रकरणी 24 तासात बोरिवली, बांगूरनगर व भोईवाडा येथे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बनावट लसीकरणाप्रकरणी गुन्ह्यांची संख्या सातवर पोहोचली आहे.
तर, 'मुंबईतील 7 ते 8 सोसायट्यांनी स्वतः संपर्क साधून मला सांगितले, की या सर्वात मोठ्या बनावट लसीकरण कांडमध्ये त्यांचा काहीच हात नाही. तर, दुसरीकडे पोलिसांनी काही सोसायट्यांवर तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु, यात निष्पाप सोसायट्यांवर तक्रार दाखल करण्यात येऊ नये. यात त्यांचा काहीही दोष नाही', असे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.