MP Gopal Shetty : नौपाड्यातील आदिवासी मुलींसोबत क्रिकेट खेळून खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले प्रोत्साहन - संजय गांधी नॅशनल पार्क
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क, नौपाडा येथे राहणाऱ्या आदिवासी मुलींच्या ( Tribal Girls ) संघातर्फे मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन श्रमजीवी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी ( MP Gopal Shetty ) यांनी क्रिकेट खेळून मुलींचे प्रोत्साहन वाढवले. यावेळी खासदार शेट्टी व उद्योजक शाह यांनी मुलींना क्रिकेटचे साहित्य भेट देत त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, आदिवासी कुटुंबासाठी घरकूल योजना राबवावी यासाठी सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, काही स्थानिक नेत्यांमुळे याठिकाणी राजकारण होत आहे. यामुळे येथील आदिवासी अनेक सुविधांपासून वंचित आहेत