जळगाव वसतिगृह प्रकरण : भाजप आमदार श्वेता महाले यांच्याशी विशेष चर्चा - BJP MLA Shweta Mahale news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - जळगावमधील महिला वसतिगृहात महिलांना नग्न करून नाचायला लावण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा मुद्दा भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत लावून धरला. याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात समिती नेमून दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
मात्र, राज्यात अशा प्रकारच्या घटना होत आहेत, येथे कायदा-सुव्यवस्था आहे का नाही? त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र, या मागणीवर आक्षेप घेत हे वाक्य पटलावरून काढण्याची विनंती करण्यात आल्यानंतर हे वाक्य कामकाजातून काढण्यात आले. मात्र, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, अशी खंत भाजप आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केली. या मुद्द्यावर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंदीकर यांनी..
TAGGED:
BJP MLA Shweta Mahale news