देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्याची नवाब मलिकांची पात्रता नाही - निलेश राणे - नवाब मलिक यांच्यावर राणेंची टीका
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप करण्याची नवाब मलिक (Nawab Malik) यांची पात्रता नाही, अशी टीका भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane cirtcism) यांनी केली आहे. ते आज (बुधवारी) गणपतीपुळे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता बोलत होते. यावेळी राणे म्हणाले की, नवाब मलिक कोण होते कुर्ल्यामध्ये, काय करायचे, आम्ही योग्य वेळी तोंड उघणार असल्याचे राणे म्हणाले. पवार साहेब यांच्यावर दाऊदबाबत एवढे आरोप झाले, त्यावर नवाब मलिक का बोलत नाहीत ? मुंब्रामध्ये सर्वजण धुतल्या तांदळासारखे आहेत का? हे लोक कोणा कोणाला पोसत आहेत, हेच खरंतर आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला घातक असल्याची टीकाही यावेळी निलेश राणे यांनी केली. दाऊद आणि तेलगी यांनी देखील शरद पवार यांचे नाव घेतलेले आहे. त्यावर राष्ट्रवादी काय बोलणार आहे? त्याला काय उत्तर देणार आहेत हे ? असा सवाल भाजपा नेते निलेश राणे यांनी केला आहे.