अनिल परब यांचा काउंटडाउन आता सुरू झाला - किरीट सोमैया - सचिव बजरंग खरमाटे
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - परिवहन मंत्री अनिल परब यांचा आता काउंटडाउन सुरू झाला आहे आणि त्यांचे विशेष सचिव बजरंग खरमाटे यांच्याकडे 40 प्रॉपर्टीची बेहिशोबी साडेसातशे कोटींची मालमत्ता आहे. ती कुठून आली? या माहितीची मागणी आपण केली आहे. तर खरमाटे यांची ही संपत्ती आहे की, अनिल परब यांचा बेनामी पैसा आहे. लवकरच समोर येईल. पण ठाकरे सरकारांचा एक अनिल तुरुंगाच्या दरवाजावर आहेत. तर दुसरा अनिल म्हणजे अनिल परब मुहूर्त काढत आहे, अशा शब्दात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी टीका केली आहे. तसेच खरमाटे यांची ईडीची चौकशी सुरू झाली आहे. त्यानंतर सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्याकडूनही चौकशी होईल, असे मतही किरीट सोमैया यांनी व्यक्त केले. सांगलीच्या तासगाव येथील वंजारवाडीमधील बजरंग खरमाटे यांच्या घराची किरीट सोमैया यांनी पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते.