VIDEO : पवार कुटुंबीयांची भाऊबीज आनंदोत्सवात साजरी - sharad pawar family bhaubeej celebration
🎬 Watch Now: Feature Video
बारामती (पुणे) - दिवाळीमधील शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज होय. भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळते. त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करते. हाच महत्वाचा सण बारामतीत पवार कुटुंबीयांनी मोठ्या आनंदोत्सवात साजरा केला. बारामतीतील काटेवाडी येथे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतापराव पवार यांचे त्यांच्या भगिनी मीनाताई जगधने यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे, विजया पाटील, रजनी इंदुलकर, शमा पवार, अश्विनी पवार, नीता पाटील, निमा माने यांनी व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे सई पवार आणि देवयानी पवार यांनी औक्षण करून भाऊबीज साजरी केली.