सिव्हिल इंजिनिअर बनला समाजसेवक - 'होपमिरर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान शेख

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 4, 2021, 2:19 PM IST

पनवेल - जिल्ह्यातील धानसर या छोट्याशा गावत राहणारे रमझान शेख हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. शिक्षणानंतर रमजान परदेशात जाऊन भरपूर पैसे कमवतील हे घरातील सदस्यांचे स्वप्न होते. परंतु देशभक्तीच्या प्रेमाने रमजानला थांबवले. त्यांनी लोकांना मदत करण्यासाठी, एक संस्था तयार केली आहे ज्याचे नाव 'होपमिरर फाऊंडेशन' आहे. रमझानने सिव्हील अभियांत्रिकीची नोकरी सोडून दिली आहे. होपमिरर फाऊंडेशनच्या माध्यमातून संस्थापक रमजान शेख आणि त्यांची टीम कोरोना कालावधीत गरजूंना रेशन आणि अन्य सहाय्य वितरणाशिवाय, महिला सक्षमीकरणासाठी सॅनिटरी पॅडचे सतत प्रशिक्षण आणि वितरण करीत आहेत. रमझान शेख आणि त्यांची टीम शैलेश पटेल, अरमान शेख, रमेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली होपमिररने मालाड (पूर्व) येथील 100-170 गरजू लोकांना पावसाळ्यापूर्वी छत्र्यांचे वाटप केले आहे. रमजान आणि शैलेश पटेल यांनी सांगितले की, ते गरजू लोकांना 500 पेक्षा अधिक छत्री वाटप करणार आहेत. ते म्हणाले की, होपमिरर फाऊंडेशनचा उद्देश म्हणजे लोकांना मदत करणे, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटविणे होय. मदतीची आवश्यकता असणाऱ्यांनी रमझान शेख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.