VIDEO : मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाचे सौंदर्य फुलले - अहमदनगर ताज्या बातम्या
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पाणलोटात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. भंडारदरा परिसरात सर्वत्र डोंगरांवरून धबधबे कोसळताना दिसू लागले आहेत. तर काही ठिकाणी भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. पावसामुळे धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. मुळा पाणलोटात हरिश्चंद्रगड, आंबित, पाचनई, कुमशेत परिसरात संततधार सुरू आहे. अंबित कोथले धरण ओव्हर फ्लो’ झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटघर व रतनवाडीत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात 6 हजार 239 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र तसेच कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरात ही जोरदार पाऊस कोसळत असल्याने कोतूळ येथून मुळा नदीत 16750 क्युसेसने पाणी वाहत आहे.
Last Updated : Jul 22, 2021, 9:19 PM IST