नागपुरात बँड पथकाने लता दीदींना वाहिली श्रद्धांजली; पाहा Video - नागपूर लेटेस्च न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - लता दीदींनी हजारो सुमधुर गाण्यांची कोट्यवधी रसिकांना भेट दिली. आज लतादीदींना त्यांच्याच गाण्यांमधून त्यांचे चाहते श्रद्धांजली अर्पण ( Paid homage to Lata Didi In Nagpur ) करत आहेत. नागपुरात उत्तम बँड पथकानेही आगळ्या वेगळ्या पद्धतीने गानकोकिळा भारतरत्न लता दीदींना बँड पथकाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. उत्तम बँड पथकाने दीदींच्या नावाजलेल्या 'ये मेरे वतनके लोगो जरा अखोमे भरलो पाणी' या गाण्याची धून वाजवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. नागपुरातील महाल परिसरात अत्यंत व्यस्त बडकस चौकावर आज आगळ्या वेगळ्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला.