Ancient Kolhapur Temple Reconstruction : शेकडो वर्षे जुन्या या मंदिराचे का काढले जात आहेत संगमरवर... - Ancient Kolhapur Temple Reconstruction

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 9, 2021, 8:06 PM IST

कोल्हापूर - अंबाबाई मंदिराचे आता मूळ रुप भाविकांना दिसून येणार आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिराचे काम ( Kolhapur Mahalaxmi Temple reconstruction ) हाती घेतले आहे. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येण्यापूर्वी मंदिरामध्ये अनावधानाने वेळोवेळी बदल करण्यात आले होते. या बदलामुळे अंबाबाई मंदिराच्या मूळ स्वरूपातील सौंदर्याला धक्का बसला होता. अनेक कोरीव दगडांवर चुना लावण्यात आला होता. तर मंदिरात सर्वत्र दगडांवर संगमरवरी फरशी बसविण्यात आल्या होत्या. त्याशिवाय मंदिरातील काचेच्या झुंबरसाठी लोखंडी अँगल लावण्यात आले होते. तेसुद्धा काढण्याचे काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुरू केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र्र देवस्थान समितीचे ( West Maharashtra Devsthan Samiti ) सचिव शिवराज नायकवडी यांनी ( Shivraj Naikwadi on Ambabai Temple work ) ईटीव्ही भारतला दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.