अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य नगरी सज्ज
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्राची 'साहित्य जत्रा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यंदाचे ९३ वे वर्ष आहे. मराठवाड्याला तब्बल 16 वर्षांनी सातव्यांदा तर उस्मानाबाद जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. १०, ११ आणि १२ जानेवारीला या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलन, निमंत्रित साहित्यिक, राज्यभरातले साहित्यिक, विद्यापीठांचे भाषा प्रमुख, साहित्य रसिक आणि विद्यार्थी या सगळ्यांच्या नजरेतून साहित्य संमेलन काय आहे, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. ईटीव्ही भारतच्या 'साहित्याची जत्रा' या विशेष कार्यक्रमात संमेलनाच्या पूर्वतयारीचा खास रिपोर्ट.