भारत बंद : किसान संघर्ष समन्वय समितीचे बिंदू चौकात ठिय्या आंदोलन - कोल्हापूर भारत बंद बातमी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या भारत बंदला पाठींबा देण्याकरिता आज अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने कोल्हापुरातील बिंदू चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील, अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली.