कंगना रणौत जे बोलली, त्याच्याशी मी सहमत; विक्रम गोखलेंकडून पाठराखण - कंगना रणौत लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने जे काही वक्तव्य केले आहे, ते बरोबर आहे, असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram gokhale) म्हणाले. स्वतंत्र हे आपल्याला दिले गेलेले आहे. जे स्वतंत्र योद्धा स्वातंत्र्यासाठी लढत होते, ते जेव्हा फाशीवर चढत होते तेव्हा त्याकाळचे मोठ्या लोकांनी त्यांना वाचवले नाही आणि ते लोक स्वातंत्र्यानंतर केंद्रीय मंत्री झाले, असे देखील यावेळी गोखले म्हणाले. आपण कोणत्याही पक्षाशी, राजकारण्याशी संबंधित नाही असे ते म्हणाले, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)च्या कामाचे कौतुक करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.