अमरावतीच्या सावंगी मग्रापूर पाणीपुरवठा प्रकरणात आमदार प्रताप अडसड यांचे कारवाईचे आदेश - सावंगी मग्रापूर पाणीपुरवठा प्रकरण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 3, 2022, 3:21 PM IST

अमरावती -अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील (Chandur Railway Taluka) सावंगी मग्रापूर या गावात ग्रामपंचायतने (Savangi Magrapur Grampanchayat) एका वस्तीतील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी मध्यरात्रीपासून गाव सोडून गावाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणात स्थानिक भाजपचे आमदार प्रताप अडसड (BJP Mla Pratap Adsad) यांनी गंभीर दखल घेत दोषीवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या संदर्भात तक्रार आली असून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून स्थानिक राजकारणमुळे पाण्यापासून कोणाला वंचित ठेवत असल्याने आता गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती आमदार प्रताप अडसड यांनी दिली. आता लवकरच गावातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सरपंच शालू सूर्यवंशी व उपसरपंच जुरावर खा पठाण यांनी दिली. दरम्यान, वस्तीतील पाईपलाईन तोडली त्यामुळे हा प्रकार घडला व ग्रामपंचायतवरील आरोप हे चुकीचे असल्याचे उपसरपंच पठाण यांनी सांगितले. आता गावात पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही आंदोलन सुरूच आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.