51 Ganesha Idol In 5 Hours : ५ तासांमध्ये बनवले ५१ पर्यावरणपूरक गणपती, ७ वर्षीय चिमुकलीची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद - पूर्वा प्रमोद बगळेकर
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - कौलखेड येथील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या ७ वर्षाच्या मुलीने ५ तासांत ५१ पर्यावरणपूरक गणपती ( 51 Ganesha Idol In 5 Hours ) बनवून नवा विक्रम केला आहे. तिच्या या उपक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डने ( 7 Year Girl In India Book Record )नोंद घेतली आहे. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे. पूर्वा प्रमोद बगळेकर ( Poorva Pramod Bagalekar ) असे या चिमुकलीचे नाव आहे. ही कला तिच्या वडिलांकडून पाहून शिकली आहे. वडील हे शिल्पकार आहेत आणि आई ममता चित्रकार आहे. तिच्या या कलेमुळे तिने अकोल्याचे नाव देशपातळीवर कोरले आहे. तिच्या या कार्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे. १७ जानेवारी रोजी तिची नोंद इंडिया बुक रेकॉर्डने केले असल्याचे मेलद्वारे सांगण्यात आले आहे. तिने इतरही स्पर्धेत पारितोषिक मिळविले आहे. तिला तिचा हा विक्रम आता लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ( Limca Book Of Record ) कोरायचा आहे. यासाठी ती आणखी परिश्रम करणार असल्याचे तिने सांगितले आहे.
Last Updated : Feb 17, 2022, 9:04 AM IST