Gold seized : कॉफीच्या बाटल्यांमध्ये लपवलेले ३.८० किलो सोने जप्त - १८ केनियन महिलांची तपासणी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai International Airport) सीमाशुल्क अधिकार्यांनी (Customs officials) शारजाहून आलेल्या केनियन महिलांच्या गटाकडून कॉफी पावडरच्या बाटल्यांमध्ये लपवलेले ३.८० किलो सोने आणि काही वैयक्तिक वस्तू जप्त (3.80 kg gold seized) केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, विमानतळावर १८ केनियन महिलांची तपासणी (Investigation of 18 Kenyan women) केली. यावेळी बार, वायर आणि पावडरच्या स्वरूपात कॉफी पावडरच्या बाटल्या, आतल्या कपड्यांचे अस्तर, पादत्राणे आणि मसाल्याच्या बाटल्यांमध्ये सोने लपवले होते. एकूण ३.८०किलो सोने जप्त करण्यात आले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत काही कोटीत आहे.या प्रकरणी केनियन महिलेलाअटक करण्यात आली आहे. तर इतरांना सोडून देण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे.