गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक - human sacrifice dongaon
🎬 Watch Now: Feature Video
जालना - गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना जालन्यातील टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. जाफ्राबाद तालुक्यातील डोनगाव या गावात हा प्रकार घडत असल्याचे समोर आल्यानंतर येथे ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींमध्ये 2 पुरुषांचा समावेश असून बुलडाण्यातील उंबरखेड येथील एका महिला मांत्रिकाला देखील अटक करण्यात आली आहे. डोनगाव येथील एका महिलेने आणि गावकऱ्यांनी हे तीन आरोपी गावातील जुन्या वाड्यातील गुप्तधनाच्या शोधात असून गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने या प्रकरणाचा तपास करत तिन्ही आरोपींना तातडीने अटक केली. तिन्ही आरोपींवर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.