ऑस्ट्रेलियन ओपन : २२ वर्षीय ब्रॅडीची उपांत्य फेरीत धडक - Australian Open 2021 Jennifer Brady
🎬 Watch Now: Feature Video
अमेरिकेची २२ वर्षीय महिला टेनिसपटू जेनिफर ब्रॅडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. ब्रॅडीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्याच जेस्सिका पेगुलाचा ४-६, ६-२, ६-१ असा पराभव केला. आता तिला उपांत्य फेरीत कॅरोलिना मुकोवाशी सामना करावा लागणार आहे. मुकोवाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अश्ले बार्टीला पराभूत केले आहे.