आयसीसीचा नवा पुरस्कार : रूटसह भारताच्या रिषभ पंतला नामांकन

By

Published : Feb 3, 2021, 6:28 AM IST

thumbnail
ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाची कामगिरी करणारा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन देण्यात आले आहे. पंतसोबत इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंगलाही नामांकित करण्यात आले आहे. आयसीसीने क्रिकेटपटूंसाठी एक नवा पुरस्कार सुरू केला आहे. यंदाच्या वर्षात जानेवारीपासून दर महिन्याला हा पुरस्कार देण्यात येईल. 'आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू', असे या पुरस्काराचे नाव असणार आहे. पुरुष व महिला अशा दोन्ही वर्गवारीत हा पुरस्कार देण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.