श्री उमांगमलज रथातून निघणार 'दगडूशेठ' गणपतीची मिरवणूक..., पाहा व्हिडिओ - Anant Chaturdashi 2024 - ANANT CHATURDASHI 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 16, 2024, 6:25 PM IST
पुणे Anant Chaturdashi 2024 : पुण्यात अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीला (Ganpati Visarjan Miravnuk) सुरूवात होणार आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्सवाचं यंदा १३२ वं वर्ष आहे. यंदा 'श्री उमांगमलज' रथामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. यंदाची प्रतिकृती ही जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे रथाची मांडणी करण्यात आली आहे. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरु देखील आहे. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर हा तोललेला आहे, बाजूला २१ छोटे कळस लावण्यात आले आहेत. तर, रथावर २३ नंदींचे चेहरे बसविण्यात आले आहेत. तसेच रथावर तब्बल १८ क्रिस्टलची झुंबर लावण्यात येतील.