Go For Gold! प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायकांनी दिल्या 'लवलिना बोर्गोहेन'ला अनोख्या शुभेच्छा - Sudarsan Pattnaik on Boxer Lovlina
🎬 Watch Now: Feature Video
भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 69 वजनी गटात उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केलं आहे. तिला उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी कलाकृतीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पटनायक यांनी ओडिसाच्या एका बीचवर लवलिनाचे एक सुंदर वाळू शिल्प साकारलं आहे आणि त्यावर त्यांनी, 'लवलिनाचे अभिनंदन, गो फॉर गोल्ड' असे लिहलं आहे.